प. बंगाल तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला प्रारंभ

पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज (गुरुवार) 62 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

पश्‍चिम बंगालमधील एकूण 294 जागांसाठी एकूण 6 टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून आज तिसऱ्या टप्प्यात 62 जागांसाठी मतदान होत आहे. त्यामध्ये 34 महिला उमेदवारांसह 418 उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. आजच्या टप्प्यात 1 कोटी 37 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुर्शिदाबाद, नादिया, वर्धमान आणि उत्तर कोलकातामधील 62 मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. सुरक्षेसाठी एक लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत.

आज सकाळपासूनच मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. पहिल्या दोन टप्प्यात मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून पहिल्या टप्प्यात 80.92 टक्के तर दुसऱ्या टप्प्यात 79.91 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *