पीएम मोदी यांचा आज जम्मू दौरा

पीएम मोदी यांचा आज जम्मू दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर असून त्यांनी नुकतेच श्री माता वैष्णवी देवी नारायण सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे औपचारिक उद्घाटन केले आहे. २३० बेडची  क्षमता असणाऱ्या या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. ८ एप्रिलपासूनच हे हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेसाठी पूर्णतः कार्यरत झाले आहे.

‘हॉस्पिटलमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. येथील मोफत ओपीडी चे काम १५ मार्चपासूनच सुरु झाले आहे. अनेक जम्मू-काश्मिरी नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी हॉस्पिटल नेहमीच तत्पर असेल’, अशी माहिती हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी वैष्णवी देवी विद्यापीठाच्या ५ व्या दीक्षांत सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तेथे ते विद्यार्थ्यांना मौलिक संदेश देणार असून विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाचेही उद्घाटन करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *