ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांना धमकी

ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांना धमकी

ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष के. देसाई यांना सोमवारी एका निनावी पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी मिळाली. महालक्ष्मी ही अंबाबाई असून, ती शिवपत्नी आहे, अशी मांडणी डॉ. देसाई करत असल्याने त्यांना ही धमकी आली. दरम्यान, डॉ. देसाई यांनी याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी या घटनेची दखल घेतली असून, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांना पत्राच्या अधारे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून डॉ. देसाई यांच्या निवास परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यांना लवकरच संरक्षण देण्याबाबत विचार सुरु आहे, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *