सोमवारी रात्री उशिरा परळ-सातारा एसटी बसला बोर घाटात आग लागल्याची घटना घडली. आगीचे कारण स्पष्ट झाले नसून चालकाच्या केबिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. आग लागल्याचे समजताच एसटी चालक आणि वाहकाने प्रसंगावधान दाखवून प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. –