वारंवार होणा-या बिघाडांमुळे त्रस्त असलेल्या हार्बरवरील प्रवाशांना डीसी-एसी परिवर्तनामुळे दिलासा मिळत नाही तोच शुक्रवारी सायंकाळी ऐन गर्दीच्यावेळी लोकलचे युनिट फेल झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यामुळे गर्दीच्यावेळी २५ फे-या रद्द करण्याची नामुष्की मध्य रेल्वे प्रशासनावर ओढवली.
शुक्रवारी संध्याकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास सीएसटीहुन पनवेलसाठी निघालेल्या लोकलचे युनिट फेल झाले. अखेर सायंकाळी ६ वाजुन ४५ मिनिटांच्या सुमारास रेल्वे रुळावरुन बाजुला करण्यात आली.
तर दुपारी २ वाजुन २० मिनिटांच्या सुमारास चुनाभट्टी स्थानकात एका रिक्षा चालकाने फाटक ओलांडल्यामुळे लोकलची वाहतुक सुमारे २० मिनिटे उशिराने होत होती. त्यामुळे हार्बर मार्गावर लोकलच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.