कन्हैया कुमारला धमकीचे पत्र; सुरक्षेत वाढ

कन्हैया कुमारला धमकीचे पत्र; सुरक्षेत वाढ

देशद्रोहाचा आरोप असलेला व जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) छात्रसंघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला धमकीचे पत्र दिल्ली पोलिसांना मिळाले आहे. या पत्रानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांना गुरुवारी एक पत्र मिळाले आहे. पत्रात म्हटले आहे की, कन्हैया कुमार व उमर खालिद यांचे शीर धडावेगळे करणाऱ्याला बक्षीस दिले जाईल. पत्रामध्ये अनिल जानी असे नाव आढळून आले आहे. शिवाय, पोलिसांना रात्री एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी केला होता. ‘जेएनयू‘जवळून जाणाऱ्या 605 क्रमांकाच्या बसमध्ये गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ बसची तपासणी करून पिस्तूल व काडतुसे जप्त केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, पोलिसांनी ‘जेएनयू‘ प्रशासनालाही याबाबत माहिती दिली असून, कन्हैयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *