जपानमध्ये भूकंपात 9 ठार; 800 जखमी

दक्षिण जपानमध्ये झालेल्या भूकंपामध्ये किमान नऊजण मृत्युमुखी पडले आहेत, तर 800 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.5 एवढी असून, यामध्ये अनेक घरे कोलमडली आहेत. तसेच, रस्ते उखडले गेले आहेत, असे जपान सरकारच्या प्रमुख प्रवक्त्याने सांगितले.

राजधानी टोकियोपासून नैऋत्येला 1300 किलोमीटर अंतरावर भूकंप झालेल्या प्रदेशाला भेट देऊन तेथील नुकसानीची पाहणी करून अंदाज घेणार असल्याचे जपान मंत्रिमंडळाचे मुख्य सचिव योशिशिदे सुगा यांनी सांगितले.
आपत्तीग्रस्त भागात सुमारे 1600 सैनिक तैनात करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच, सैनिकांकडून हजारो आपत्तीग्रस्त लोकांना गोधड्या व कपड्यांचे वाटप करण्यात येत असल्याचे जपानी वृत्तवाहिन्यांनी दाखविले. घरे उद्ध्वस्त झाल्याने अनेक लोक असुरक्षित झाले आहेत, त्यांनी मिळेल तिथे आसरा घेतला आहे. काही लोक सकाळी घरी परतले, तर सुमारे 44 हजार लोकांनी सरकारकडे आश्रयाची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *