मोहालीच्या पोलिस अधीक्षकांची संपत्ती 152 कोटी!

मोहालीच्या पोलिस अधीक्षकांची संपत्ती 152 कोटी!

पंजाब पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधीक्षक गुरप्रीत सिंग भुल्लर यांची संपत्ती तब्बल 152 कोटी रुपये एवढी आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या यादीद्वारे पुढे आली आहे.

पंजाब कॉंग्रेसचे आमदार केवल धिलॉंन व करण कौर ब्रार हे विधानसभेतील दोन श्रीमंत आमदार आहेत. दोघांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार धिलॉन यांची संपत्ती 137 कोटी व करण ब्रार यांची संपत्ती 128 कोटी रुपये एवढी आहे. मात्र, या दोघांपेक्षाही भुल्लर हे अधिक श्रीमंत ठरले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मोहालीचे सर्वाधिक काळ पोलिस अधीक्षकपद भूषविलेल्या भुल्लर यांची एकूण संपत्ती 152 कोटी रुपये एवढी आहे. सन 2009 ते 2013 व 2015 पासून ते आतापर्यंत भुल्लर मोहालीचे ते पोलिस अधीक्षक आहेत. त्यांच्या एकूण 16 मालमत्ता असून त्यामध्ये आठ रहिवासी, चार शेती भूखंड व तीन व्यापारी मालमत्ता आहेत. मध्य दिल्लीत बाराखंबा रस्त्यावर 85 लाखांचा व्यापारी भूखंड व दिल्लीच्या पॉश सैनिक फार्म्सवर येथे 1500 स्कवेअरचा मोकळा भूखंड आहे. मोहालीत बरेली गावात 45 कोटींची जमिन आहे. कागदपत्रांनुसार भुल्लर यांना जास्तीत जास्त मालमत्ता वडिलोपार्जित मिळाल्या आहेत.

दरम्यान, पंजाबमधील 130हून अधिक आयपीएस अधिकाऱ्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *