चित्रपटांतून आपल्या अफलातून भूमिकांमुळे रसिकांमध्ये लोकप्रिय असलेला सुपरस्टार रजनीकांतचा 600 किलोग्रॅम चॉकलेटचा पुतळा तयार करण्यात आला आहे.
रजनीकांतला नुकतेच पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर चाहत्यांनी एकत्र एकत्र येत चेन्नईमध्ये हा पुतळा तयार केला आहे. येथील झुका नावाच्या कॉफी शॉपमध्ये हा पुतळा तयार करण्यात आला आहे.
विजय मल्ल्या थोडे स्लिम होऊन अमिताभ बच्चन यांच्यासारखी पोज देऊन उभे राहिले आहेत की काय असा आभास या पुतळ्याकडे बघून होऊ शकतो. परंतु, ते शक्य नाही. हेअर स्टाईल, गॉगल्स आणि चेहऱ्यावरील हावभाव यांमुळे रजनीकांत यांची ही ‘चॉकलेट छबी‘ लक्षात येते.
रजनीकांतचा 600 किलोंचा चॉकलेटचा पुतळा
