अभिनयाचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी रणबीर कपूरचे कौतुक करताना रणबीर बॉलिवूडचा मोठा स्टार असल्याचे म्हटले आहे. टि्वटरवर अमिताभ यांनी आपल्या ‘अजूबाट चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देताना रणबीरचे कौतुक केले.
‘अजूबा’च्या फोटोंमध्ये तुम्ही छोटया रणवीरला पाहिले आहे का ? किती गोड दिसतो. २५ वर्षानंतर आज तो मोठा स्टार आहे असे अमिताभ यांनी आपल्या टि्वटसमध्ये म्हटले आहे. ‘अजूबा’मध्ये अमिताभ यांच्यासोबत रणबीरचे वडील ऋषी कपूर यांनी सुद्धा काम केले होते.
अमिताभ आणि ऋषी कपूर यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे पण रणबीर आणि अमिताभ यांनी आतापर्यंत एकाच भूतनाथ रिटर्न्स चित्रपटात एकत्र काम केले आहे. अमिताभ सध्या शूजित सरकारच्या ‘पिंक’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. यात त्यांनी वकिलाची भूमिका केली आहे.