फोटो काढण्याच्या नादात लँडींग करणारं विमान गेलं हातावरुन

फोटो काढण्याच्या नादात लँडींग करणारं विमान गेलं हातावरुन

आपल्याला हवा तसा फोटो मिळवण्यासाठी फोटोग्राफर काय करतील याचा काही नेम नाही. असाच एका लँडींग विमानाचा फोटो काढण्याचा नादात सेंट बार्ट्स आयलँडवर मेक्की जैदी या फोटोग्राफरने आपला जीव गमावला असता. फोटो काढण्याच्या नादात विमान आपल्या केवढ जवळ आलं आहे याची त्याला कल्पनाच आली नाही. आणि विमान चक्क त्याच्या डोक्यावरुन निघून गेलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विमानाचं चाक मेक्कीच्या बोटाला चाटून गेलं.

सेंट बार्ट्स आयलँडवरील गुस्ताफ 3 हे विमानतळ जगातील धोकादायक विमानतळांपैकी एक आहे. येथील विमाने पॅसेंजर विमानांप्रमाणे मोठी नसतात आणि वैमानिकांनाही विशेष प्रशिक्षण द्यावे लागते.  विमानातील अंतर थोडं जरी कमी असत तर कदाचित मेक्की जैदी यांना आपला जीव गमवावा लागला असता. पण नशिबाने ते वाचले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे विमानाचं चाक त्यांच्या बोटाला चाटून गेलं. विमान गेल्यानंतरी मेक्की जैदी मात्र फोटो काढताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *