राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रियांका चोप्रा, सानिया मिर्झा, रजनीकांत, रामोजी राव, उदित नारायण यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे मंगळवारी हा सोहळा पार पडला.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. २८ मार्चला ५६ मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते तर इतर मान्यवरांना मंगळवारी पुरस्कार देण्यात आले.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना पद्मविभूषण पुरस्कार, अभिनेत्री प्रियांका चोप्राला पद्मश्री पुरस्कार तर सानिया मिर्झाला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रामोजी समुहाचे प्रमुख रामोजी राव यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

