ठाण्यातील भिवंडी भागातील कासिमपूर परिसरात एका चार मजली इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या कपड्याच्या गोडाऊमध्ये ही आग लागली. इमारतीच्या वरील तीन मजल्यावर सुमारे 150 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कपड्यामुळे आग भडकली असून, त्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वर अडकलेल्या धोकांना धोका पोहचण्याची भीती आहे. घटनास्थळी 6 पाण्याचे टॅंकर दाखल झाले असून, आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अपडेटस-
चार मजली इमारतीच्या तळमजल्यावर कपड्याचे गोडाऊन आहे. याच कपड्याचे गोडाऊनमध्ये आग लागली आहे.
– खाली दुकाने तर वर रहिवासी राहतात. आग खालीच लागल्याने वरील मजल्यावरील लोक अडकले आहेत.
– खाली दुकाने तर वर रहिवासी राहतात. आग खालीच लागल्याने वरील मजल्यावरील लोक अडकले आहेत.
– आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
– पोलिसांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या जवानाच्या मदतीने इमारतीतील लोकांना बाहेर काढले जात आहे.
– ही इमारत गर्दीतील भागात असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत.
– पोलिसांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या जवानाच्या मदतीने इमारतीतील लोकांना बाहेर काढले जात आहे.
– ही इमारत गर्दीतील भागात असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत.