गोळीबारात जखमी तांदूळ व्यापाऱ्याचा मृत्यू

विरार मध्ये रात्री चंदनसार तांदूळ  मार्केट मध्ये  झालेल्या गोळीबारात तांदूळ मार्केटचे व्यापारी  रमण शहा (वय ५२)  यांचे नुकतेच विरार येथील संजीवनी रुग्णालयात निधन झाले.त्यांच्यावर काल मार्केट यार्डमधून पैशांची बॅग घेऊन जात असताना गोळीबार झाला होता.

रमण शहा चंदनसार मार्केटमधून आपले दुकान बंद करून जात होते. त्याच्याकडे त्यावेळी ३० लाख रुपयांची रोकड होती. ही रक्कम ते त्यांच्या ‘टीवा’ गाडीच्या डिकीत ठेवत असताना समोरून दबा धरून बसलेल्या पल्सर गाडीवरील दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर तीन राउंड फायर केले. त्यापैकी एक गोळी रमण शहाच्या छातीत लागली आणि ते जमिनीवर कोसळले. गोळीबार झाल्यानंतर मार्केटमध्ये गोंधळ उडाला. त्यातच हल्लेखोर पसार झाले. जखमी रमण शहा यांना तत्काळ विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गोळीबाराचा आवाज येताच व्यापारी रमण शहा यांचा मदतनीस वर्मा त्यांच्याकडे धावत आला. त्यावेळी जवळच असणाऱ्या मारेकऱ्यांसोबत वर्माची झटापट झाली. मात्र मारेकऱ्यांनी वर्माच्या डोक्यात बंदुकीचा दट्टा मारला मारला आणि तेथून टे पसार झाले.

अज्ञात दोन चोरट्यांनी रमण शहा यांच्याकडील पैशांची बॅग हिसकून घेत ते महामार्गाकडे फरार झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *