देहू देवस्थानचे माजी विश्वस्त मोरे महाराज यांच्या मुलाच्या साखरपुड्यामध्ये जेवण केल्यांनंतर नवरदेवासह ७० ते ८० जणांना विषबाधा झाली आहे. हा प्रकार रविवारी रात्री उशिरा घडला.
आनंद मोरे यांच्या मुलाचा रविवारी नांदे गावात साखरपुडा होता. या साखरपुड्यात जेवण केल्यानंतर ७०ते ८० जणांना विषबाधा झाले. यामध्ये नवरदेवालाही विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्यांवर देहुगाव आणि चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत