सराफांचा बंद तात्पुरता मागे

गेल्या अनेक दिवसांपासून देशभर सुरू असलेला सराफ व्यावसायिकांचा संप तात्पुरता मागे घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारपासून पुढील १० दिवस सराफी दुकाने खुली करण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालय आणि सराफ असोसिएशनच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला. यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मध्यस्थी केली. २४ एप्रिलपासून संसद पुन्हा सुरू होणार असल्याने सरकारला निर्णयासाठी हा दहा दिवसांचा कालावधी देण्यात आल्याचे नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *