ब्रसेल्स हल्ल्यातील अतिरेक्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले

ब्रसेल्सच्या विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित एका संशियत दहशतवाद्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध झाले आहे. हॅट व फिकट रंगाचे जॅकेट या संशयिताने दहशतवाद्यांनी घातले असल्याचे या चित्रफितीत दिसून येते आहे. ब्रसेल्समधील युरोपिअन युनियन या भागापर्यंत या संशयिताची हालचाल सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या माध्यमातून टिपण्यात आली

आहे. त्यानंतर हा संशयित त्या भागातून नाहिसा झाल्याचे आढळून येते. ब्रसेल्समधील विमानतळ व मेलबीक मेट्रो स्थानकावरील आत्मघाती हल्ल्यात 32 जण ठार झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *