मुंबईच्या डबेवाल्यांकडून प्रिन्सेस केटला पैठणीची भेट

प्रिन्स चार्ल्स यांचे सुपुत्र प्रिन्स विल्यम आणि त्यांच्या पत्नी प्रिन्सेस केट हे शाही दाम्पत्य भारताच्या दौऱ्यावर आले असून त्याची सुरुवात रविवारी मुंबई भेटीपासून झाली. हे शाही दाम्पत्य रविवारी सकाळी मुंबईत आले. मुंबईचे डबेवाले आणि प्रिन्स चार्ल्स यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. प्रिन्स चार्ल्स यांचा मुलगा आणि सून मुंबई भेटीवर येणार आहेत हे समजल्यानंतर त्यांचा खास सत्कार करण्याचे मुंबई डबेवाल्यांनी ठरविले होते. पण प्रत्यक्ष भेट न मिळाल्याने आता सोमवारी मुंबईतील ब्रिटन वाणिज्य दूतावासाच्या कार्यालयात या शाही दाम्पत्यासाठी आम्ही घेतलेली भेट नेऊन देणार आहोत, असे मुंबई डबेवाला संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले. प्रिन्सेस केट यांना पैठणी तसेच विल्यम यांना शाल, श्रीफळ आणि पांडुरंगाचे छायाचित्र असलेली फ्रेम भेट देणार असल्याचे तळेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *