इंडोनेशियातील ‘तरंगता’ बाजार!

बाजारातील ‘वाहती गर्दी’ असा आपण कधी कधी शब्दप्रयोग करीत असतो; पण थायलंड, इटलीतील व्हेनिस आदी ठिकाणी बाजारच ‘वाहता’ किंवा ‘तरंगता’ असतो. इंडोनेशियातही असाच ‘तरंगता बाजार’ आहे. तिथे नदीत बोटींची रांग असते आणि प्रत्येक बोटीत फळे, भाज्या, मासे वगैरे विक्रीसाठी ठेवलेले असतात. बॅन्टन फ्लोटिंग मार्केट असे या बाजाराचे नाव आहे. साऊथ बोर्नियोमधील अमुन्टाई येथील  या बाजाराची अनेक छायाचित्रे  आहेत. बोटीतून सामान विकणारे हे लोक बरेच अंतर वल्हवत जात असतात. नदीच्या आसपास राहणार्‍या गावातील लोक त्यांचे ग्राहक असतात. जुकुंग नावाच्या छोट्या, निमुळत्या होडीत विक्रीचे साहित्य भरलेले असते. सकाळी लवकरच हे विक्रेते बोटी घेऊन बाहेर पडतात आणि सायंकाळी आपल्या घरी परततात. वल्हवतच सामानाची खरेदी आणि विक्री सुरू असते. या बोटींमध्ये फुले,फळे आकर्षक रितीने मांडलेली असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *