दिल्ली, मुंबई, गोव्यात हाय अलर्ट

दिल्ली, मुंबई, गोव्यात हाय अलर्ट

तीन पाकिस्तानी दहशतवादी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि सुसाईड बेल्ट घेऊन भारतात शिरले आहेत. मारुती स्विफ्ट डिजायर गाडीतून आलेले हे तीन दहशतवादी दिल्ली, मुंबई किंवा गोवा येथे हल्ला करण्याची शक्यता आहे.

गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडे असलेल्या मारुती कारला जेके-०१ एबी २६५४ या क्रमांकाची नंबरप्लेट आहे. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. दिल्ली, मुंबई व गोवा आणि नजीकच्या भागात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

दहशतवादी सैन्याच्या इमारती, शॉपिंग मॉल, बाजारपेठ, रेल्वे स्थानक आणि शैक्षणिक संस्था यासारख्या गर्दीच्या ठिकाणी हल्ला घडवून आणू शकतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच ठिकठिकाणी तपासणी नाक्यावर कसून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *