विखे साखर कारखान्यात मळीची टाकी फुटून तीन ठार

प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात मळी साठवलेली टाकी फुटून बुधवारी झालेल्या अपघातात तीन जण ठार आणि नऊ जण जखमी झाले.

उपमुख्य रसायनतज्ज्ञ विनोद दादा जोंधळे (वय 61), वेल्डर बाळू संपत देवरे (वय 58) व कर्मचारी शशिकांत भिकाजी पगार (वय 56) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. जखमींवर लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमारे तीन हजार टन मळी साठविलेल्या प्रचंड आकाराच्या लोखंडी टाकीच्या एका बाजूचा पत्रा फुटल्याने ती कोसळली. यातील मळीचा लोंढा प्रचंड वेगाने बाहेर पडला. काही क्षणात मळी पूर आल्यासारखी वाहू लागली. त्यात या भागात काम करीत असलेले कर्मचारी वाहून गेले. आजूबाजूला असलेल्या लोखंडी सामानावर काही जण आदळले. त्यात तीन जण ठार झाले आणि नऊ जण जखमी झाले. अपघातामुळे कारखान्याचे गाळप बंद पडल्याने तेथील ऊस गणेश साखर कारखान्याकडे वळविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *