एमपीएससीचा निकाल जाहीर, अभिजित नाईक प्रथम

एमपीएससीचा निकाल जाहीर, अभिजित नाईक प्रथम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१५ साली घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत अभिजित नाईक यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच रवींद्र राठोड यांनी द्वितीय, तर अतुल पंडित यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

उपजिल्हाधिकारी परीक्षेत मुलींमध्ये सुहसिनी गोणेवार – प्रथम, स्नेहा उबाळे – द्वितीय , प्रियंका आंबेकर – तृतीय, शक्ती कदम – चौथा, विठ्ठल कदम – पाचवा, उमाकांत पंडित – सहावा यांनीही यश मिळविले.

पोलीस उपअधीक्षक पदाच्या परीक्षेत राहुल धस यांनी प्रथम, मिलिंद शिंदे यांनी द्वितीय आणि कुणाल सोनवणे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध पदांच्या परीक्षांचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला. मात्र, संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाल्याने अनेकांना निकाल पाहता आला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *