भुजबळांच्या अडचणीत वाढ; `आर्मस्ट्राँग’ची मालमत्ता जप्त

मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयातर्फे चौकशी सुरु असलेल्या छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या अडचणीत वाढच होत असून नाशिक येथील आर्मस्ट्राँग एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या नाशिक व मुंबईतील माझगाव येथील मालमत्ता  स्टेट बँक ऑफ इंडियाने ताब्यात घेतल्या आहेत. तशा आशयाची नोटीस बँकेने वर्तमानपत्रांतूनही प्रसिध्द केली आहे. त्यात छगन भुजबळ यांचे नाव नसले तरी त्यांचीही चौकशी सध्या सुरु आहे. या कंपनीचे कर्जदार व हमीदार म्हणून समीर व पंकज भुजबळ तसेच मे. रबरेक्स कंपनीचे नाव जाहिरातीत प्रसिध्द करण्यात आले आहे. सहा कोटींचे हे कर्ज फेडण्यासाठी त्यांना दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच या मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार कोणी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या जाहिरातीचे कात्रण खासदार किरीट सोमय्यांच्या कार्यालयातून प्रसिध्दीसाठी पाठविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *