विक्रमगड ग्रामपंचायत निवडणूक न लढण्याचा सर्वपक्षीयांचा निर्णय

विक्रमगडमधील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी विक्रमगड ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत करण्यासाठी 17 एप्रिल रोजी होत असलेल्या पंचायत निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

विक्रमगड तालुक्याच्या निर्मितीला सतरा वर्ष होऊनही तालुक्याला बॅंक, न्यायालय, उपजिल्हा रूग्णालय,  बस आगर व बस स्थानक इ. सारख्या मुख्य सुविधेकरीता तालुक्यातील नागरीकांना आजही पायपीट करावी लागत आहे.विक्रमगड ग्रामपंचायतही तालुक्यातील महत्वाची व मोठी ग्रामपंचायत असतांना शहराच्या विकासाच्या दृष्टीने पाहिजे त्याप्रमाणात शासकीय निधी मिळत नसल्याने विक्रमगडचा योग्य प्रमाणात विकास झाला नाही असा आरोप सर्व पक्षांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *