पाकिस्तानी तपास पथकाच्या उलटय़ा बोंबा

पठाणकोट हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ला हा पाकपुरस्कृत नसून भारताने स्वतःनेच घडवलेला आहे, या निष्कर्षाप्रत पाकिस्तानहून आलेल्या तपास यंत्रणेचे अधिकारी पोहोचले असल्याचे समजते. पाकिस्तानची प्रतिमा खराब करण्यासाठीच भारताने हा बनाव रचला आणि पाकिस्तानकडे बोट दाखवले अशा उलटय़ा बोंबा या तपास यंत्रणेने लावला असल्याचे समजते. या पथकाने ही भूमिका अधिकृतरित्या घोषित केल्यास भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिकच बिघडतील अशी चिन्हे आहेत. भारत सरकारनेही कडक भूमिका घेत, ही पाकिस्तानची नेहमीचीच नौटंकी असल्याचे म्हटले आहे. संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटले की, पाकिस्तानने एकदा दहशतवादाविरोधी भूमिका स्पष्ट करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *