तिरंगा फडकावून राष्ट्रगीत गाणार्‍या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या नॅशनल इन्स्टिीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) कॅपसमध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर एनआयटीच्या कॅम्पसमध्ये सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहे.

एनआयटीच्या कॅम्पसमध्ये बिगर काश्मीर विद्यार्थ्यांनी मागील काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी झेंडा दाखवला होता. इतकेच नव्हे तर भारतीय तिरंग्याला विरोध केला होता. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा अाढावा घेतला आहे. मुफ्ती यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

काय आहे प्रकरण?
नुकत्याच झालेल्या टी20 वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्ये टीम इंडियाच्या वेस्ट इंडिजकडून झालेल्या पराभवानंतर काही बिगर काश्मीरी विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी झेंडे दाखवत देशविरोधी घोषणाबाजी केली होती. या घटनेवरुन दोन गटात वाद झाला होता. यानंतर एनआयटी प्रशासनाने होस्टेल आणि क्लास बंद ठेवले होते.

प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत काही विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये तिरंगा फडकावून राष्ट्रगीत गाऊन या घटनेचा विरोध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *