माजी कर्णधार राहुल द्रविड हा राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक व्हावा, असे बीसीसीआयला वाटते.
बीसीसीआयच्या सल्लागार समितीच्या बैठकीत मंगळवारी प्रशिक्षक निवडीबाबत चर्चा होणार आहे.
या समितीमध्ये विक्रमवीर सचिन तेंडुलकरसह माजी कर्णधार सौरव गांगुली तसेच माजी कसोटीपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणचा समावेश आहे.
द्रविडने बीसीसीआयच्या १९ वर्षाखालील तसेच भारत ‘अ’ संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे.

