मेहबूबा मुफ्तींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी शपथ घेतली.

मुफ्ती जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्याने जम्मू काश्मीरमध्ये नव्या इतिहासाची नोंद झाली आहे.

यावेळी उपमुख्यमंत्रीपदी भाजपचे निर्मलकुमार सिंह विराजमान झाले. त्यांच्यासह १६ कॅबिनेट, आठ राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. या कार्यक्रमासाठी केंद्रातील मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासह काही भाजप नेते उपस्थित होते.

सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी मेहबूबा मुफ्तींना गोपनीयतेची शपथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *