शनि चौथा-यावर महिलांना प्रवेश करण्यापासून रोखल्यामुळे वाद अजून सुरूच आहे तोच महालक्ष्मी मंदिरातील गाभा-यात प्रवेश करणा-या महिलांना पुजारी महिलांनीच अडविल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.
अवनी संस्थेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी अंबाबाईच्या मंदिरात प्रवेश करून गाभा-या घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील महिला पुजा-यांनी त्यांना रोखून धरत आत प्रवेश करण्यास नकार दिला.
यामुळे महिला कार्यकर्त्या संतापल्या होत्या. तर घडल्याप्रकारामुळे मंदिरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी महिलांना बाहेर आणले.
