करवाल नगरमधील सरकारी मुलींच्या शाळेमध्ये नापास झालेल्या 600 विद्यार्थिनींनी शाळेतील विविध वस्तूंची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
सरकारी मुलींच्या शाळेत इयत्ता 9वी ते 11वीच्या वर्गातील एकूण 600 विद्यार्थिनी नापास झाल्या आहेत. निकाल हाती आल्यानंतर विद्यार्थिनींनी शाळेतील खुर्च्या, पंखे, विजेची उपकरणे व विविध वस्तूंची तोडफोड केली. शाळेमध्ये गोंधळ निर्माण झाल्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले.
शाळेच्या व्यवस्थापनातील सुशलेश म्हणाल्या, नापास झालेल्या विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यास सुरवात केल्यामुळे पोलिसांना बोलविण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. शाळेत तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
