१९१२ साली उत्तर अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिक या ऐतिहासिक महाकाय जहाजाची प्रतिकृती निर्माण करण्याचे वसा घेतलेल्या चीन स्थित कंपनीने घेतला असून टायटॅनिकची प्रतिकृती ऑक्टोबर २०१७ पर्यंत तयार होऊन जनतेसाठी खुले होईल अशी आशा व्यक्त केली आहे. १६१ मिलियन यूएस डॉलर्स खर्ची करून चीन मधील सिचुआन स्थित एनर्जी कंपनी टायटॅनिकची हुबेहुब प्रतिकृती निर्माण करत आहे.
१५ एप्रिल १९१२ साली उत्तर अटलांटिक महासागरात घडलेल्या या ऐतिहासिक दुर्घटनेची आणि संपूर्ण जहाजाची माहिती लोकांना मिळावी या उद्देशातून टायटॅनिकची प्रतिकृती उभारण्याची कल्पना पुढे आल्याचे सेव्हन स्टार एनर्जी कंपनीने सांगितले. २०१३ साली टायटॅनिकची प्रतिकृती साकारणार असल्याची घोषणा सेव्हन स्टार एनर्जी कंपनीने केली होती. यासाठी मूळ टायटॅनिक जहाजाची लहान आवृत्ती म्हणून ओळख असलेल्या आरएमएस ऑलम्पिक जहाजाचे डिझाईन्स अमेरिका स्थित कंपनीकडून भाडेतत्वावर घेतले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले होते. टायटॅनिकची प्रतिकृती तयार झाल्यानंतर चीनमधील क्वि नदीच्या डॉकवर कायमस्वरुपी ठेवण्यात येणार आहे. जहाज पाहण्यासाठीच्या तिकीटासाठी नागरिकांना तीन हजार युआन खर्ची करावे लागतील.
चीनची कंपनी निर्माण करतेय ‘टायटॅनिक’ची प्रतिकृती

