विमान अपहरणकर्ता अटकेत

विमान अपहरणकर्ता अटकेत

इजिप्त एअरलाईन्सच्या विमान अपहरणकर्त्याला अटक केले असून विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे इजिप्त एअरने सांगितले.

इजिप्त एअर विमानाचे अपहरण करणारी व्यक्ती इजिप्तची नागरिक असून त्याचे नाव सैफ अलदिन मुस्तफा असल्याचे इजिप्त एअरने सांगितले.

अपहरण झालेल्या इजिप्त एअर विमानातील सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

अपहरण केलेले इजिप्त एअरलाईन्सचे हे विमान सायप्रस येथे उतरवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी ‘फ्लाइट एमएस१८१’ हे अलेक्झांड्रिया येथून कैरोच्या दिशेने निघाले होते.

सकाळी साडेआठच्या वाजण्याच्या सुमारास विमानतळाच्या कंट्रोल रुमला इमर्जन्सी लँडिंगबाबत मेसेज मिळाला आणि ८ वाजून ५० मिनिटांनी या विमानाचे सायप्रसच्या अर्नाख विमानतळावरर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

या विमानामधील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरुप आहेत. यात ८१ प्रवासी, तीन विमानतळ सुरक्षा अधिकारी, आठ ब्रिटीश आणि १० अमेरिकन प्रवाशांचा समावेश आहे. त्यापैकी सुरुवातीला महिला आणि मुले मिळून २० जणांची सुटका करण्यात आली. त्यानंतर विमानातील कर्मचा-यांना ओलीस ठेवले होते. मात्र सुरक्षा यंत्रणांनी विमान अपहरणकर्त्याला शिताफीने अटक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *