भारतीय चित्रपटसृष्टीत नवीन विक्रम प्रस्थापित करणाऱ्या बाहुबली या तेलगू चित्रपटाची 63 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड करण्यात आली आहे.
आज (सोमवार) राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांची पिकू चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली. तर, तनू वेड्स मनू रिटर्न्समधील भूमिकेसाठी कंगना राणावतची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड झाली. बाजीराव मस्तानी या चित्रपटाचे दिग्दर्शक संजयलीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून निवडण्यात आले आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्याकडे आज तीन सदस्यीय परीक्षकांच्या गटाने पुरस्कार विजेत्यांची यादी सूपूर्द केली. यानंतर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
