४० लाख चिनी विद्यार्थ्यांनी घेतले परदेशात शिक्षण

गेल्या ३८ वर्षात ४० लाखांहून अधिक चिनी विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेतले आहे. त्यापैकी २२ लाख जण मायदेशी परतले आहेत, अशी माहिती चीनच्या शिक्षण खात्याने दिली.

१९७८पासून चिनी विद्यार्थ्यांमध्ये परदेशी शिक्षणाचे प्रमाण वाढू लागले आहे. जवळपास ४४ लाख विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेतले आहे. २०१५ मध्ये पाच लाख २० हजार विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेले होते. त्यापैकी ४ लाख ९ हजार जण चीनमध्ये परत आले.

परदेशातून शिकून आलेल्या विद्यार्थ्यांनी बीजिंग, गुंजझाऊ, शांघाय व शेंझेन या शहरातच राहणे पसंत केले. केवळ ३.३२ टक्के विद्यार्थ्यांनी व्यवसाय करण्याचे ठरवले.

या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन, विज्ञान व अर्थशास्त्र या विषयाचे शिक्षण घेतले. विशेष म्हणजे ९७ टक्के विद्यार्थ्यांनी स्वबळावर हे शिक्षण घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *