रेल्वेचे तिकीट आता फोनवरून रद्द करा

रेल्वेतर्फे लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे रेल्वे तिकीट आता फोनवरून रद्द करण्याची सुविधा रेल्वे प्रवाशांना देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसे वाचणार आहेत. ही सुविधा एप्रिलपासून सुरू होईल.

नवीन पद्धतीविषयी माहिती देताना वरिष्ठ रेल्वे अधिका-याने सांगितले की, आरक्षित तिकीट रद्द करण्यासाठी प्रवाशांनी १३९ क्रमांक दाबावा. त्यानंतर आपले तिकीट रद्द करण्यास सांगावे.

या बदल्यात संबंधित प्रवाशाला ‘वन टाईम पासवर्ड’ (ओटीपी) मिळेल. तो ओटीपी घेऊन प्रवाशाने त्याच दिवशी रेल्वे आरक्षण खिडकीवर जाऊन आपले तिकिटाचे पैसे परत घ्यावेत, असे अधिका-याने सांगितले.

सध्या रेल्वे तिकीट परताव्याचे नियम बदलल्याने प्रवाशांना मोठया अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वेळेत तिकीट रद्द न केल्याने प्रवाशांना पैसे गमवावे लागतात. सध्या तिकीट रद्द करण्याचे शुल्क रेल्वेने दुप्पट केले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा भरुदड सहन करावा लागत आहे. त्यामुळेच आम्ही फोनवरून तिकीट रद्द करण्याची योजना आणली आहे, असे अधिकारी म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *