सोलापुरमध्ये विजयपूरच्या होर्टी गावाजवळ शनिवारी रात्री २ वाजता एका कंटेनरच्या धडकेत सहा ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाला आहे.
ऊसतोड हंगाम संपवून हे मजूर परतीच्या दिशेने जात असताना मागच्या दिशेने येणा-या कंटेनरने त्यांच्या ट्रॅक्टरला धडक दिली. हे मजूर बीड आणि परभणी जिल्ह्यातील होते.
सहाजणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कराण्यात आले आहे. मुस्तकीम बेग, मुमताज बेग, मैरुन बेग, विमल डांबळे, विराज डांबळे आणि आरोही ढाले अशी मृतांची नावं आहेत.