संगणकाचा महत्त्वाचा भाग ‘मदर बोर्ड‘ चिप बनविणारी जगातील आघाडीची व सर्वांत मोठी कंपनी इंटेल कॉर्पोरेशनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी ग्रूव्ह यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.
नाझी राजवटीत वाढल्यानंतर तरुण वयातच हंगेरीतून बाहेर पडून अमेरिकेत गेलेल्या ग्रूव्ह यांनी 1980 च्या दशकात इंटेल कंपनीला दिवाळखोरीपासून वाचविले. ग्रूव्ह यांचे निधन सोमवारी झाले असल्याचे इंटेलच्या वतीने सांगण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण नमूद करण्यात आले नाही.
इंटेलमध्ये 37 वर्षे कार्यरत असताना कंपनीला चिप बनविणारी जगातील सर्वांत मोठी कंपनी बनविण्यात ग्रूव्ह यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांना पार्किन्सनचा आजार होता, तसेच 1990च्या दशकाच्या मध्यात त्यांना ग्रंथींचा कर्करोगही झाला होता.