पुणेः डीएसके विश्वमध्ये चार दुचाकी जळून खाक

सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरातील डीएसके विश्वमध्ये अचानक लागलेल्या आगीत चार दुचाकी जळून खाक झाल्याचा प्रकार घडला आहे. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

सिंहगड रस्ता अग्निशामन दलाचे केंद्र प्रमुख प्रभाकर उमराठकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी किरकटवाडीतील डीएसके विश्वमधील भास्करा सोसायटीच्या “एफ‘ बिल्डींगच्या पार्किंगमध्ये सोमवारी रात्री सव्वादोनच्या सुमारास ही आग लागली. त्यात अँक्‍टिव्हा, अँक्‍सिस आणि यामाहा अशा चार गाड्‌या जळून खाक झाल्या. या चार गाड्‌यांसोबतच बाजूला असलेल्या इतरही सहा दुचाकी आणि एका सायकलला आगीची झळ पोहोचली आहे. पण तोवर आगीचे लोळ तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. पण तोवर आगीचे लोळ तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. पहाटे दोन वाजून 22 मिनिटांनी अग्नीशामक दलाला याची माहिती मिळाली. सुमारे दहा-पंधरा मिनिटात या ठिकाणी पोहोचलेल्या अग्नीशामक दलाने अवघ्या दहाच मिनिटात ही आग आटोक्‍यात आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *