दोन देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती भारतात परतले

दोन देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती भारतात परतले

स्वीडन आणि बेलारुस या दोन देशांचा पाच दिवसीय दौरा आटोपून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी गुरुवारी रात्री भारतात परतले.

स्वीडन आणि बेलारुसच्या दौ-यामुळे भारत आणि या दोन्ही उभय देशांच्या संबंधांना नवी भरारी मिळाली असल्याचे राष्ट्रपती मुखर्जी यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांनी भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन केल्याचे मुखर्जी यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वासाठी हे दोन्ही देश भारताला समर्थन करीत आहेत त्यामुळे या दौ-याला विशेष महत्त्व आहे. स्वीडन आणि भारताचे संबंध अनेक दशकांपूर्वीचे आहेत तर युरेशियन भागात बेलारुस असल्यामुळे त्याचे एक वेगळे महत्त्व आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *