१) एक वाटी पनीर
२) अर्धी वाटी किसलेलं चीज
३) एक चमचा आलं-लसूण-मिरची वाटून
४) पाव वाटी बारीक चिरलेली कोथिबीर
५) मीठ-मिरपूड
६) सात-आठ ब्रेड स्लाईस
७) पाव वाटी टोमाटो सॉस
८) थोडं लोणी .
कृती :-
१) ब्रेडच्या स्लाईसना एका बाजूनं टोमाटो सॉस लावावा . पनीर कुस्करून घेऊन त्यात इतर साहित्य मिसळावं .
२) निम्म्या ब्रेड स्लाईसवर हे मिश्रण पसरून वर उरलेले स्लाईस लावून त्याचे सॅन्डविच तयार करावेत .
३) वाटल्यास बाहेरच्या बाजूनं लोणी लावून नॉनस्टीक तव्यावर भाजावेत किंवा सॅन्डविचमेकर , ओव्हनमध्ये भाजावेत . लोणी न लावताही तसेच भाजून कापून घेता येतात .