‘टॉप टेन क्रिमिनल्स’च्या सर्च लिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आणि फोटो दिसत असल्याबद्दल इंटरनेट विश्वातील ‘बिग बॉस’ गुगलनं मोदींची माफी मागितली आहे. ‘टॅगिंग’मुळे किंवा मोदींबाबतच्या मजकुरात ‘क्रिमिनल’ शब्दाचा वापर जास्त झाल्यानं हे झालं असावं, ते आमचं मत बिलकूलच नाही, असा खुलासाही कंपनीनं केला आहे.
‘टॉप १० क्रिमिनल्स’मध्ये नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे एका ब्रिटिश दैनिक व सदोष ‘मेटाडेटा’मुळे आली असे ‘गुगल’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणात छायाचित्रांचा ‘सर्च’ करताना येणारे ‘रिझल्ट्स’ मोदी यांच्या बाबतीतील अनेक बातम्यांमधून एकत्रित होत होते. यात मोदी यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकीय नेत्यांबाबत केलेल्या वक्तव्यांचा समावेश होता. या बातम्या मोदी यांना कुठल्याही गुन्हेगारी घटनांसोबत जोडत नाही आणि शब्द एकमेकांशी साधर्म्य साधत असल्यामुळे हे ‘रिझल्ट्स’ समोर आले असेदेखील ‘गुगल’तर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, दिवसभर ‘गुगल’वर ‘टॉप १० क्रिमिनल्स’ असे
टाकल्यावर नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे येत होती. यामुळे मोदी समर्थक भडकले व ‘टिष्ट्वटर’सह ‘सोशल मीडिया’वर ‘गुगल’वर टीकेचा भडिमार सुरू झाला. ‘टिष्ट्वटर’वर हाच मुद्दा ‘ट्रेन्डिंग’ होता. त्यामुळे ‘गुगल’वर जाऊन या ‘क्रिमिनल्स’ची माहिती घेण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. यात मोदींसमवेत अनेक भारतीयांची छायाचित्रे येत होती. पहिल्या १२ छायाचित्रांमध्येच मोदी यांचे छायाचित्र ३ वेळा आल्यामुळे मोदी समर्थकांची नाराजी वाढली.