रात्रीस खेळ चाले..’विरोधात तक्रार!

रात्रीस खेळ चाले..’विरोधात तक्रार!

‘झी मराठी’ वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री साडेदहा वाजता प्रसारित होणा-या ऐकिव आणि काल्पनिक गोष्टींवर आधारित ‘रात्रीस खेळ चाले..’ या मालिकेविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी ही मालिका असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.
कोकणात आजही भुताखेतांच्या गोष्टी चवीचवीने सांगितल्या जातात. त्या समज-गैरसमजातून रचल्या गेलेल्या असतात; मात्र त्यांना कोणताही आधार नसतो. अशाच काहीशा ऐकिव आणि काल्पनिक गोष्टींवर आधारित ‘रात्रीस खेळ चाले.’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित करण्यात येत आहे.

या मालिकेत कोकणातील नाईक कुटुंबीयांची कथा दाखवण्यात आली आहे. कटुंबातील कालावधीनंतर घरात शुभ कार्य होणार असल्याने माधव कुटुंबासह कोकणात येतो; मात्र गावी आल्यानंतर विचित्र आणि तर्क नसलेल्या घटनांनी मालिकाच सुरू होते.

या मालिकेतून कोकणातील अतार्किक घटना दाखवण्यात आल्या आहेत. त्यातून अंधश्रद्धेला खतपाणीच घातले जात आहे, असा आरोप करत चिपळूण पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. भुताखेतांच्या नावाखाली निसर्गसंपन्न कोकणची बदनामी होत आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *