उस्मानाबाद एसटी डेपोत मेकॅनिकची बसमध्येच आत्महत्या

उस्मानाबादमधील एसटी डेपोत काम करणा-या एका मेकॅनिकने डेपोमध्ये उभ्या असलेल्या एका बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी लातूरला बस घेऊन जाण्यासाठी बस ड्रायव्हर व कंडक्टर बसमध्ये चढले असता, बसमध्येच एका कर्मचा-याचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. हा मृतदेह एसटी डेपोत मेकॅनिकचे काम करणा-या इसमाचा असून त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. कामाच्या तणावातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *