युझर्स वाढविण्यासाठी मोबाईल कंपन्या कमी किंमतीचे, चांगले फिचर्ससहीत स्मार्टफोन बाजारात आणत असतात. मात्र, आता मोबाईल कंपन्या कॉल दरातही सूट देत आहेत.
आयडिया कंपनीने आपल्या युझर्ससाठी एक रुपयात एक जीबी ३जी इंटरनेट देण्याची घोषणा केली आहे. आयडिया मोबाईल अॅपची ही सेवा अँड्राईट, आयओएस आणि विंडोज फोनवर असणार आहे.
या सेवेचा फायदा करून घ्यायचा असेल तर आयडिया मोबाईल अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यामध्ये मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करावा लागणार आहे.
त्यानंतर एक रुपयांचा रिचार्जचे ऑप्शन दिसेल आणि त्यावर क्लिक केल्यानंतर फोनमध्ये एक जीबीपर्यंत ३ जी डाटा केवळ एक रुपयांत मिळणार आहे.