प्राप्तीकर मर्यादेत कोणताही बदल नाही- जेटली

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (सोमवार) अर्थसंकल्प संसदेत सादर करताना करदात्यांसाठी नऊ कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. प्राप्तिकर मर्यादेत कोणताही बदल केला नसून, लहान करदात्यांकडे विशेष लक्ष दिले आहे. 5 लाखांपर्यंत कमाई असलेल्या नोकरदारांना आयकरामध्ये 3 हजारांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळणार आहे.

करदात्यांसाठी अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये-

  • प्राप्तिकर मर्यादेत कोणताही बदल नाही, करसवलतीची मर्यादा 2.5 लाखांवरच.
  • 5 लाखांपर्यंत कमाई असलेल्या नोकरदारांना आयकरामध्ये 3 हजारांपर्यंतची अतिरिक्त सूट.
  • 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांना 2 हजारांऐवजी 5 हजारांची सवलत.
  • घर भाडे करसवलतीची मर्यादा 24 हजारावरून 60 हजारपर्यंत वाढवली.
  • लहान करदात्यांकडे विशेष लक्ष.
  • छोट्या करदात्यांना वर्षाला 3 हजार रुपयांपर्यंतचा दिलासा.
  • करप्रक्रिया सुलभ करण्यावर भर.
  • कर भरण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणणार.
  • करदात्यांसाठी नऊ कलमी कार्यक्रमाची घोषणा.
  • कर्मचारी भविष्य निधी अंतर्गत नव्याने येणाऱया कर्मचाऱयांसाठी पहिली तीन वर्ष सरकारचे योगदान 8.33 टक्के राहणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *