प्रियांका चोप्राच्या हस्ते ऑस्कर पुरस्कार प्रदान

88 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला पुरस्कार प्रदान करण्याचा मान मिळाला. अमेरिकेतील प्रसिद्घ पीपल्स चॉईस ऍवॉर्डवर अभिनेत्री प्रियांका चोप्राने मोहर उमटवत भारताचे नाव उज्ज्वल केले होते.

त्यानंतर पुन्हा एकदा भारताच्या शिरपेचात तिने मानाचा तुरा खोवला आहे. हॉलीवूडमध्ये मानाचा समजल्या जाणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात यंदाच्या पुरस्कार प्रदान करणाऱ्यांत तिचे नाव झळकले. जगभरातील चित्रपट रसिक आणि समीक्षकांमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्याबाबत उत्सुकता असते. अमेरिकन टीव्ही मालिका “क्वॉन्टिको‘तील भूमिकेमुळे प्रियांकाने आधीच हॉलीवूडमध्ये आपली छाप पाडली आहे. त्यासाठी तिला पीपल्स चॉईस ऍवॉर्ड देऊन गौरवण्यात आले आहे. ऍकॅडमीने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात पुरस्कार प्रदान करणाऱ्या नावांची यादी नुकतीच “ट्विटर‘वरून जाहीर केली करत प्रियांकाचे नाव होते.
प्रियांकासोबत पुरस्कार प्रदान करणाऱ्यांच्या यादीत स्टीव्ह कॅरेल, क्विंसी जोन्स, ब्युंग हान, जेरेड लेटो, ज्युलियन मुरे, ऑलिव्हिया मून, मरगॉट रोबी, जसोन सेगेल, अँडी सेर्किस, जे. के. सिमन्स, केरी वॉशिंग्टन आणि रिस विदरस्पून यांचाही समावेश होता. पुरस्कार प्रदान करण्याचा मान मिळवलेल्या “देसी गर्ल‘वर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *