पुण्यातील भोसरी एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनीला आग लागली. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही मोठी आग लागली आहे.
भोसरी एमआयडीसीत ’जे’ ब्लॉकमधील क्वालिटी कंपनीसमोरील एल.के केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल करण्यात आल्या आहेत.
यामध्ये कोणिही जखमी झाल्याचे वृत्त नाही. आग विझविण्याचे काम सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.