सध्या ट्रेंड आहे नो मेकअप लुकचा. सध्याच्या इंटरनॅशनल मॉडल्स देखील चक्क मेकअप न चढवता रॅम्पवर उतरतात. याचा अर्थ आहे की मेकअप न करताही तुम्ही सुंदर दिसू शकता. मात्र त्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते.
* मेकअप नसल्यावर आपलं खरं सौंदर्य उघड होणार म्हणून त्वचेकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे. त्वचा तजेलदार दिसण्यासाठी तिचा ओलावा जपणं गरजेचं असतं. म्हणून दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं.
* सनस्क्रीन, मॉइश्चराईजर, कोल्ड क्रीम किंवा अश्या बेसिक क्रीम किंवा ब्युटी प्रॉडक्ट्स खरेदी करताना किमतीचा विचार करू नाक. दर्जेदार उत्पादनांसाठी पैसे जास्त खर्च करावे लागले तरी हरकत नाही कारण शेवटी प्रश्न आपल्या सौंदर्याचा आहे.