सोमनाथ मंदिरात प्रवेशासाठी हिंदूंव्यतिरिक्त इतरांनी परवानगी घ्यावी, मंदिर प्रशासनाचा फतवा

सोमनाथ मंदिरात प्रवेशासाठी हिंदूंव्यतिरिक्त इतरांनी परवानगी घ्यावी, मंदिर प्रशासनाचा फतवा

गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या प्रशासनाने एक वादग्रस्त फतवा काढला आहे. हिंदूंव्यतिरिक्त इतर धर्मियांना मंदिरात थेट प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हिंदूंव्यतिरिक्त इतर धर्माच्या पर्यटकांना मंदिरात थेट प्रवेश मिळू शकत नाही. यासाठी त्यांना जनरल मॅनेजरची परवानगी घ्यावी लागणार आहे.

बहुतेक हिंदू मंदिरांमध्ये हाच नियम असून तीर्थस्थळाचं पावित्र्य अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं जनरल मॅनेजरचं म्हणणं आहे. ही सरसकट बंदी नाही, तिचा कुठल्याही विशिष्ट धर्माशी संबंध जोडू नये, असंही त्यांचं म्हणणं आहे.

सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं असून पर्यटक आणि भाविकांचा सोमनाथ मंदिरात ओघ असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *