दहावी निकालाची तारीख शनिवारी जाहीर करणार

दहावी निकालाची तारीख शनिवारी जाहीर करणार

अफवांचे पीक आलेल्या दहावीच्या निकालाची तारीख आता शनिवारी सहा जूनला अधिकृतपणे जाहीर होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी हा खूलासा केला आहे.

दहावीच्या निकालाच्या तारखांविषयी गेल्या आठवड्याभरापासून व्हॉट्सअप आणि अन्य सोशल मिडियावर वेगवेगळे मेसेजेस फिरत आहेत.

मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदा जवळपास आठवडाभर आधी ऑनलाइन निकाल उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांनाही निकालाबाबत उत्सुकता लागली आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या तारखेवर पालक व विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *